HIMPAM चंद्रपूरतर्फे स्थापना समारंभ संपन्न

⚫ HIMPAM चंद्रपूरतर्फे स्थापना समारंभ संपन्न


चंद्रपूर —
HIMPAM (Homoeopathic Integrated Medical Practitioners Association Maharashtra), चंद्रपूर तर्फे जयश्रेया रिक्रिएशन क्लब येथे डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या २७१ व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा स्थापना समारंभ उत्साहात पार पडला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. इंदरसेन सिंग तर मान्यवर अतिथी म्हणून डॉ. काशिनाथ गौरकर उपस्थित होते.

नव्याने निवडून आलेल्या P.S.T. मध्ये अध्यक्ष म्हणून डॉ. राजेश कामडे, सचिव डॉ. विवेक कश्यप व खजिनदार डॉ. सुरेंद्र बातुलवर यांनी पदभार स्वीकारला. तसेच Joint P.S.T. मध्ये डॉ. सिराज खान, डॉ. अखिल सागलानी, डॉ. अतुल चटकी, डॉ. अभिजित सोनवणे, डॉ. युगेंद्र नगरकर व डॉ. सुशिल घुगुल यांचा समावेश आहे.

यावेळी वैद्यकिय रूग्णसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या डॉ. आनंदराव चांदेकर, पोंभुर्णा, डॉ. अनिल कोंतमवार व डॉ. मोहम्मद इस्हाक, चंद्रपूर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच तालुकास्तरावरील ८ प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प संचालक डॉ. आदित्य पतरंगे, डॉ. स्नेहल पतरंगे, डॉ. कौस्तुभ सदावर्ती, डॉ. सीमा भंडारी, डॉ. दिव्यानी लांडे व डॉ. राजेश सुर यांनी विशेष परिश्रम घेतले.
Previous Post Next Post