🔳 चंद्रपूर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसने नियोजन भवना समोर केला ईडी सरकारचा निषेध!
चंद्रपूर जिल्हा एन एस यु आय द्वारे आज पालकमंत्री कार्यालयाच्या समोर निषेधाचा फलक लावून महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला युवकांच्या रोजगारावर आणि महाराष्ट्रात होणाऱ्या गुंतवणुकीवर दरोडा टाकण्याचं काम मागील चार महिन्यापासून महाराष्ट्रातील भाजपा सरकार करीत आहे. केंद्र सरकारच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या गुजरात प्रेमी नेत्यांकडनं अथवा त्यांच्या इशाऱ्यावर ही दरोडेखोरी सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्राच्या युवकांच्या भवितव्याशी खेळ सुरू असून त्यांना भविष्यात मिळणाऱ्या रोजगारापासून परावृत केल्या जात आहे शिंदे फडणवीस सरकार सपशेल अपयशी ठरत आहेत धडधडीतपणे महाराष्ट्रात सुरू होणारे प्रकल्प गुजरात कडे वळवण्याचे काम शिंदे फडणवीस यांच्या संमतीने होत आहे असा आरोप आज नियोजन भावना समोर केलेल्या आंदोलनात जिल्हा एन. एस. यु. आय. च्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
जिल्हा एन एस यु आय चे अध्यक्ष यश दत्तात्रय यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात व महाराष्ट्र विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष श्री अमीर शेख यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. यात कृष्णा माटे ,साहिल भारती, पवन कामेपल्ली, शुभम असलवार, वैभव व्यवहारे, अमन बेले, समीर सिद्दिकी, सचिन शेंडे, जितिन पुलीपाका, इरफान शेख, सईद शेख, करण जयस्वाल, नूर अली ,साहिल अग्रवाल, वंशसिंग भाटिया ,अब्दुल शेख, सुफियान खान, साहिल खान, ओम पिदुरकर, राहुल मेश्राम, इत्यादी विद्यार्थी नेते सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून चंद्रपूरचे पालकमंत्र्यांचे कार्यालय गुजरात गुंतवणुकीचे कार्यालय आहे असा फलक सुद्धा लावला! आणि निषेधाच्या घोषणा केल्या .
Tags
Chandrapur