खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश; गोवरी पौनी प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न मार्गी


खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश;

 गोवरी पौनी प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न मार्गी



चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील गोवरी पौनी विस्तार योजनेतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित नोकरी व इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश आले असून, जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. या निर्णयामुळे गोवरी पौनी प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लागला आहे.


यावेळी बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौंडा, भुसंपादन अधिकारी जथाडे, वेकोलि बल्लारपूर क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक इलियास हुसेन, राजुरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस नेते अरुण धोटे, राजुरा काँग्रेस तालुका अध्यक्ष रंजन लांडे,माजी पंचायत समिती सभापती कुंदाताई जेणेकर यासह प्रकल्पग्रस्त व शेतकरी उपस्थित होते.

या योजनेमुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांच्या नोकरी आणि पुनर्वसनासारख्या समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या. यासंदर्भात शेतकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा केला, मात्र अद्याप त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नव्हत्या. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती.


खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. या निवेदनात त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या विस्तृतपणे मांडल्या होत्या. यात प्रामुख्याने नोकरी संबंधीची प्रलंबित फाईल त्वरित मंजूर करणे, सर्व पात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दोन महिन्यांच्या आत नोकरी देणे, अधिग्रहित जमिनीच्या क्षेत्राचा ठिकाणीच नोकरी उपलब्ध करणे आणि जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत जमीन संपादनाची प्रक्रिया थांबवणे या प्रमुख मागण्यांचा समावेश होता.

यावेळी, नोकरी वाटपात कोणताही भेदभाव न करता सर्व पात्र शेतकऱ्यांना एकाच वेळी सामावून घेणे, वेकोलि द्वारा नोकरी देताना स्थानिक ठिकाणी नोकरी देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच महिला, दिव्यांग व्यक्ती तसेच वैद्यकीय कारण जाणून स्थानिक स्थरावर त्यांना रुजु संदर्भात चर्चा करण्यात आली. वेकोलिने नोकरी सरदर्भातील अन्य क्षेत्रात पोष्टीग करण्यासंदर्भात SOP करण्या करण्यात आली आहे, त्यामध्ये बदल करण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. 

त्यासोबतच कोरपना तालुक्यातील विरूर (गाडेगाव), खैरगाव, टाकळी, चिखली येथील सेक्शन ४ व ७ मध्ये नाव असून सुद्धा सेक्शन ९ च्या अधिग्रहण मध्ये सुटलेली आहे. अशा शेतकऱ्यांची शेती अधिग्रहित करण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावर वेकोलि वणी क्षेत्राचे महाप्रबंधक संचालन पिशा रोडी यांनी सांगितले कि, भूमी अधिग्रहण संदर्भाने पत्र वेकोलि मुख्यालय येथे महाप्रबंधक भूराजस्व यांच्याकडे पाठविले असून या संदर्भात तात्काळ निर्णय घेण्यात येईल. 

तसेच यावेळी मातीच्या ढिगाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करणे, तसेच सांगोळा येथील विशिष्ट सर्वे नंबर आणि वेकोलीच्या खाणकामामुळे होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणीही खासदार धानोरकर यांनी केली होती. या सर्व मागण्या मंजूर झाल्यामुळे आज आलेले प्रकल्पग्रस्त व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. यावेळी सर्वानी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे आभार मानले. 

Previous Post Next Post