वारसदार फक्त राजकीय स्वार्थासाठी का ? - खा. प्रतिभा धानोरकर.

वारसदार फक्त राजकीय स्वार्थासाठी का ? - खा. प्रतिभा धानोरकर.


विधानसभा निवणूकीच्या प्रचाराच्या अंतिम दिवशी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विरोधकांसह अपक्ष उमेदवारांचा चांगलाच समाचार घेतला. वंचित च्या उमेदवारावर तोफ डागत त्यांनी वारसदारी दाखवणाऱ्या उमेदवारावर आपले मत व्यक्त केले.


संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधलेल्या वरोरा विधानसभा क्षेत्रात वंचित कडून दिवंगत खा. बाळू धानोरकर यांचे भाऊ अनिल धानोरकर निवडणूकीला रिंगणात आहेत. आज खा. प्रतिभा धानोरकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा येथे झालेल्या जाहिर सभेत वारसदारी सांगणाऱ्या वंचित च्या उमेदवाराचा चांगलाच समाचार घेतला. वारसदार असते तर संपुर्ण माझ्या कुटूंबाची जबाबदारी स्वीकारली असती, वारसदार असते तर माझ्या दुखात माझ्या कुटुंबाला सावरले असते. आज सांगण्यात येत असलेली वारसदारी ही केवळ राजकीय स्वार्थासाठी असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अपप्रचार करतांना आपण देखील आपल्या स्वतःहात डोकावून बघावं, त्यानंतरच दुसऱ्यांचा अपप्रचार करावा असे बोलून देखील अपक्ष उमेदवारांवर निशाना साधला. प्रहार च्या उमेदवारांबद्दल बोलतांना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, हो मी त्यांना शब्द दिला होता परंतु कॉग्रेस पक्षात प्रवेश करा अशी अट त्यांच्या समोर ठेवली होती. आजच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या भाषणातून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांची एक झलक जाहिर सभेतून बघायला मिळाली, अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती.
Previous Post Next Post