हार्मनी इनव्हेंट अँड इंटरटेनमेंट तर्फे पदमश्री स्वर्गीय मोहम्मद रफी साहेब यांचे जन्मशताब्दी महोत्सवाचा आयोजन
चंद्रपूर:- हे वर्ष पदमश्री स्वर्गीय मोहम्मद रफी साहेब यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून सर्वत्र साजरे करण्यात येत आहे. "हार्मनी इनव्हेंट अँड इंटरटेनमेंट "आपले अकरावे गौरवशाली वर्ष यावर्षी नवोदित कलाकारांसोबत मोठ्या उत्साहाने साजरे करणार आहे. दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रविवारला राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर .येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ,16 वर्षावरील इच्छुक गायक कलाकारांसाठी गाण्यांची स्पर्धक ठे.वण्यात आलेली आहे . या स्पर्धेची नोंदणी फी आहे 200 रुपये, (या स्पर्धेमध्ये व्यावसायिक कलाकारांना भाग घेता येणार नाही ). सहभागी स्पर्धकांमधून प्रथम ,द्वितीय, आणि तृतीय तसेच तीन प्रोत्साहन पर बक्षीस ठेवण्यात आलेले आहे. प्रथम पुरस्कार 5001 रुपये, द्वितीय पुरस्कार 3001 रुपये ,आणि तृतीय पुरस्कार 2001 रुपये. या कार्यक्रमात विजयी स्पर्धकांना दडिसेंबर 2024 रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये नामांकित कलाकारांसोबत गाण्याची सुवर्णसंधी देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 9970881465 या नंबर वर संपर्क साधावा.
Tags
Chandrapur