अपक्ष उमेदवार ब्रिजभूषण पाझारे यांची दिनांक 17 /11/ 24 विजयी संकल्प सभा

अपक्ष उमेदवार ब्रिजभूषण पाझारे यांची दिनांक 17 /11/ 24 विजयी संकल्प सभा 



चंद्रपूर :- नुकत्याच सुरू असलेल्या चंद्रपूर विधानसभा राखीव क्षेत्र उमेदवारी अर्ज भरणारे अपक्ष उमेदवार म्हणून  ब्रिजभूषण पाझारे यांनी अर्ज दाखल केला त्यानंतर अपक्ष उमेदवार श्री पाझारे यांना चंद्रपूर शहर व ग्रामीण मधून मिळणारे समर्थन बघता त्यांनी दिनांक 17/11/24 रोजी सायंकाळी ५.०० वाजता गांधी चौक चंद्रपूर महानगरपालिकेच्या भव्य पटांगणात अपक्ष उमेदवार ब्रिजभूषण पाझारे यांची विजयी संकल्प सभेचे आयोजन केलेले आहे. पाझारे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांना समाजातील अनेक संघटना, धर्म व सामाजिक संस्था यांचा पाठिंबा मिळत आहे. पाझारे  चंद्रपूर पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य व समाज कल्याण सभापती म्हणून पद भूषविली आहे त्यांनी त्यांच्या  कार्यकाळात अनेक जनतेच्या, समाजातील निराधार चे काम, राशन कार्ड चे काम, बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, सामाजिक सेवा अशा अनंत प्रकारची विकासाची कामे त्यांनी योग्य पद्धतीने पार पाडली परंतु भारतीय जनता पक्ष यांनी श्री पाझारे यांना मिळालेली उमेदवारीची तिकीट नाकारून दुसऱ्या व्यक्तीला दिली त्यामुळे श्री पाझारे यांचे समर्थक नाराज झाले परंतु श्री पाझारे  यांना मिळालेले समर्थन बघता पक्षाचे चिन्ह असलेले उमेदवार हे गोंधळात पडले आहे. त्यामुळे ब्रिजभूषण पाझारे यांच्या सहकाऱ्यांनी दिनांक 17/ 11/ 24 रोजी सायंकाळी ५.०० वाजता गांधी चौक चंद्रपूर येथे भव्य विजयी संकल्प सभेचे आयोजन केलेले आहे सदर सभेला ब्रिजभूषण पाझारे यांचे समर्थक, कार्यकर्ते सामाजिक संघटना तसेच चंद्रपूर शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक महिला उपस्थित राहणार आहे.
Previous Post Next Post