डेली ग्रोथ इंडिया प्रा.लि.च्या कर्मचाऱ्यांनी आदिवासी कांग्रेस शहर जिलाध्यक्ष गुंजन येरमे यांचा केला सत्कार.
चंद्रपुर :- इतिहासाला 1857 चा उठाव माहीत आहे..त्यानंतर क्रांतीची मशाल पेटवणा-या क्रांतीवीरांची नावे माहीत आहे..परंतु त्याही आधी इंग्रजाच्या जुलमी राजसत्तेला टक्कर देणाऱ्या क्रांतिवीरांची माहीती नाही..हे खरच दुर्दैव आहे..असे कित्येक क्रांतिवीर..ज्यांची भारतीय इतिहासाने दखल घेतली नाही..त्यापैकीच एक देशभक्तीने पेटलेला, अन्यायाने चिडलेला .. लढता – लढता फाशीवर चढणारा योद्धा शहीदवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांची 21 आँक्टोबर ही पुण्यतिथी आहे.
19/10/2024 रोजी डेली ग्रोथ इंडिया प्रा.लि.च्या कर्मचाऱ्यांनी एक बैठक बैठक घेतली त्यात श्री गुंजन येरमे यांचा सत्कार केला. व नॅशनल प्रेसिडेंट मोघे साहेब आदिवासी समाज महाराष्ट्र प्रदेश, अध्यक्ष आदिवासी चिंचवडकर साहेब, मा खासदार प्रतिभाताई धानोरकर, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुभाषराव धोटे साहेब तसेच चंद्रपूर शहर अध्यक्ष व मार्गदर्शक श्री रामू भैया तिवारी यांना धन्यवाद देत तेथे प्रशिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या आदिवासी समाजातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यात आले व क्रांतिवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके जी यांच्या 166 व्या पुण्यतिथी 21/10/2024 रोजी सर्व स्टॉप व आदिवासी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी (अनुसूचित जमाती) चे शहर जिल्हाध्यक्ष गुंजन किशोर येरमे यांनी केले आहे.
Tags
Chandrapur