*वेकोली नागपूरचे न्यायाधिकरण त्वरित सुरु करा*
*खासदार बाळू धानोरकर यांची केंद्रीय कोल व खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांचेकडे मागणी*
चंद्रपूर : नागपूर वेस्टर्न कोलफिल्ड लिमी येथे गेल्या एक वर्षापासून न्यायाधीकरण (Tribunal) बंद आहे. यामुळे वेकोली अंतर्गत अनेक कामांचा खोळंबा होत असल्याने हे न्यायाधीकरण त्वरित सुरु करावे अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्रीय कोल व खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांचेकडे केली आहे.
भूस्वामी प्रकल्प ग्रस्तांची वादातील प्रकरणे, पुनर्वसनाचे लाभ सुरळीतपणे मिळणे, भूमी अधिग्रहण प्रक्रिया व उत्पादन, वेकोली व्यवस्थापन व शेतक-याचा संघर्ष देखील नियंत्रणात येण्यासाठी न्यायाधीकरण अत्यावश्यक असतांना वर्षभरापासून बंद आहे. हे फारच अन्यायकारक असल्याचे खासदार बाळू धानोरकर यांनी म्हटले आहे.
हे न्यायाधीकरण त्वरित सुरु करून येथील भूमिपुत्रांना न्याय देण्याची लोकहितकारी मागणी त्यांनी केली आहे. या निर्णयाचा परिसरातील शेकडो शेतक-याना यांच्या फायदा होणार आहे.