*मोदी सरकारमुळे सर्वसामान्यांचा पैसा धोक्यात*
*काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांचा आरोप*
*अदानीच्या कंपन्यांमध्ये जबरदस्तीने केली पैशाची गुंतवणूक*
*स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर आंदोलन*
*चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा पुढाकार*
चंद्रपूर : एलआयसी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या वित्तीय संस्थांमध्ये देशातील सर्वसामान्य, मध्यमवर्ग, नोकरदार, छोटे व्यापारी यांनी आपल्या मेहनतीचा पैसा गुंतवला आहे. परंतु, केंद्रातील मोदी सरकारने अदानींच्या कंपन्यांमध्ये हा पैसा जबरदस्तीने गुंतवला आहे. अदानी समूहातील गैरकारभारामुळे गुंतवणूक केलेले कोट्यवधी रुपये परत मिळतील का, अशी भीती निर्माण झाली आहे. मोदी सरकारमुळेच सर्वसामान्यांचा पैसा धोक्यात आला असल्याचा आरोप चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केला.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने सोमवारी (ता. ६) देशभर आंदोलन करण्याच निर्णय घेतला. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील कस्तुरबा मार्गावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर आयोजित आंदोलनात श्री. तिवारी बोलत होते.
केंद्रातील मोदी सरकारने निवडक उद्योगपतींवर मेहरबानी दाखवत सामान्य माणसांचा कष्टाचा पैसा धोक्यात टाकला आहे. अदानी उद्योग समूहामध्ये एलआयसीच्या २९ कोटी पॉलिसीधारक व गुंतवणूकदारांचे ३३ हजार कोटी रुपये, तर भारतीय स्टेट बँक आणि इतर बँकांतील ४९ कोटी खातेदारांच्या ८० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. परंतु, अदानी समूहातील गैरकारभारामुळे देशभरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये हक्काचा पैसा परत मिळेल किंवा नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. काँग्रेस पक्ष कोणत्याही उद्योगपतींच्या विरोधात नाही. परंतु, खास उद्योगपतींसाठी नियम बदलून जनतेचा पैसा धोक्यात घालण्यास विरोध आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच सामान्य जनतेच्या पाठिशी उभा राहिला आहे. अदानी उद्योग समूहातील गैरकारभाराची चौकशी व्हावी यासाठी काँग्रेस पक्ष संसदेत आवाज उठवत असल्याचेही श्री. तिवारी यांनी यावेळी भाषणातून सांगितले.
अदानी समूहातील आर्थिक गैरकारभाराचा पर्दापाश करणाऱ्या हिडनबर्ग संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी व्हावी अथवा सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करावी, एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर सरकारी वित्तीय संस्थांमधील अदानी समूहात केलेल्या मोठ्या गुंतवणुकीसंदर्भात संसदेत चर्चा व्हावी व गुंतवणुकदारांच्या पैशाला संरक्षण मिळावे यासाठी सरकारने योग्य तो निर्णय घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्यासह काँग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, काँग्रेसचे प्रदेश सचिव शिवा राव, माजी महापौर संगीता अमृतकर, बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडूर, कृउबासचे माजी सभापती दिनेश चोखारे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार, ओबीसी आघाडीचे उमाकांत धांडे, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे, अश्विनी खोब्रागडे, संगीता भोयर, सुनीता अग्रवाल, चंदाताई वैरागडे, विना खनके, सुनंदा धोबे, शालिनी भगत, पप्पू सिद्दिकी, कुणाल चहारे, ललिता रेवल्लीवार, प्रवीण पडवेकर, मनीष तिवारी, पिंटू शिरवार, संजय गंपावार, रमिज शेख, राजवीर यादव, राजू वासेकर, बापू अन्सारी, मोहन डोंगरे, सचिन कत्याल, प्रदीप डे, राजू रेवल्लीवार, मनोरंजन रॉय, वंदना भागवत, अमजद अली, भास्कर माकोडे, यश दत्तात्रय, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष ताजू भाई शेख, साबीर सिद्दीकी, नीलेश ठाकरे, मनोज खांडेकर, दुर्गेश कोडाम, ताज कुरेशी, सुभाष जुनघरे, नौशाद शेख, राहुल चौधरी, गौस खान, भानेश जंगम, मोनु रामटेके, रामकृष्ण कोंडरा, स्वप्निल चिवंडे, प्रकाश देशभ्रतकर, सौरभ ठोंबरे, अशोक गड्डमवार, युनूस कुरेशी, इम्रान शेख, अयुब खान, रवी भिसे, विजय धोबे, हाजी शेख, मुन्नी मुमताज शेख, अहमदी मुजीब कुरेशी, नसरीन मोहम्मद शेख, कादर शेख, इरफान शेख, अब्दुल अजीज, अजिंक्य येरमे, मोनू रामटेके, विनोद वाघमारे, अभिजित वाटगुरे, राजेश वर्मा, वैभव रघाताटे, विनित डोंगरे, प्रवीण अडूर, आतिफ रझा यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Tags
Chandrapur