*काँग्रेसचे अध्यक्ष रामू तिवारी यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे मुस्लिम बांधवांनी विविध विकासात्मक कामाकरिता निधी उपलब्ध करण्याची मा. खासदार बाळू भाऊ यांना मांगणी केली*

काँग्रेसचे अध्यक्ष रामू तिवारी यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे मुस्लिम बांधवांनी विविध विकासात्मक कामाकरिता निधी उपलब्ध करण्याची मा. खासदार बाळू भाऊ यांना मांगणी केली.



चंद्रपूर :- शहरातील मुस्लिम बांधवांकडून विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, ही मागणी करण्यात येत होती. खासदार बालुभाऊ धानोरकर यांची भेट मुस्लिम बांधवांनी चंद्रपूर शहर जिल्हा कार्यालयात घेतली. त्यानंतर खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देत अनेक वर्षांची मागणी पूर्ण करणार असल्याचे सांगितले.


याप्रसंगी हाजी मिरजा सलीम बेग - सदर जमा मस्जिद प. द्रस्ट, मोहम्मद युनूस कुरेशी सेक्रटरी - हाजी फिफरोजखान - कॅशियर, हाजी मुस्ताकखान - ज्वा. सेक्रटरी, हाजी फ्ज काजी - सदस्य तनवीर अहमद, अय्युब खान, मौलाना वकील, मौलाना शकील रजा नायब इमाम मोहम्मद शकील बावा, इरफ्फान शेख यांची उपस्थिती होती.
Previous Post Next Post