*बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार सुरू करा*
*आमदार प्रतिभाताई धानोरकर : माढेळी व शेगाव (बु) येथे हळदी कुंकू व स्नेहमिलन सोहळा*
चंद्रपूर : ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या माध्यमातून स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करत आहेत. आत्मनिर्भर होऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. बचत गटांमुळे महिला सक्षम बनत असून त्यांच्यामध्ये वित्तीय साक्षरताही वाढत आहे. महिलांच्या विविध उपक्रमांना आपण सहकार्य करू, असे आश्वासन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिले.
वरोरा तालुक्यातील माढेळी व शेगाव (बु) येथे हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी बोर्डा सरपंच यशोदा खामनकर माढेळी येथील ग्रामपंचायत सदस्या तसेच शेगाव (बु) येथे सामाजिक कार्यकर्त्या माधुरी चिकटे, दादापूर सरपंच विद्या खाडे, पोहा सरपंच माया झाडे, भटाळा सरपंच धर्मकन्या भालेराव, बोरगाव सरपंच कमलाबाई गोवारदीपे, सोनेगाव सरपंच बुराण, चारगाव (खु) उपसरपंच सुवर्णा शेंडे, महालगाव माजी सरपंच मनीषा पुसनाके, कुसुमताई कोसूरकर, प्रीती लोणकर, घोडमारे, कोटकर व महिलांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, बचत गटांच्या माध्यमातून आत्मनिर्भर होण्यासाठी महिला पुढाकार घेत आहेत. ही बाब कौतुकास्पद आहे. कोविडच्या काळात महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी घरुनच मास्क बनविणे, सॅनिटायझर तसेच खाद्य पदार्थ आदींची निर्मिती केली. त्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पुढे देखील त्यांनी अश्याच प्रकारे काम करावे, शासकीय योजनेला लाभ घेताना कुठल्याही अडचणी आल्यास कुटुंबातील सदस्य म्हणून मी प्रत्येक महिलांच्या पाठीशी उभी राहील असे प्रतिपादन त्यांनी केले.
Tags
Chandrapur