◼️ महाराष्ट्र राज्याचे तंत्र व उच्च शिक्षण मंत्री प्राध्यापक चंद्रकांत पाटील यांनी महापुरुष बद्दल अपमान जनक वक्तव्य केल्याबद्दल निषेध व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याबाबत सिटी पोलीस स्टेशनच्या ठाणेदार यांना निवेदन दिले..
चंद्रपूर :-
महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करताना व त्या चालविताना त्यांनी लोकाकडे भीक मागितली असे अपमान जनक वक्तव्य केले ही बातमी अनेक वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेली आहे उपरोक्त महापुरुषाच्या बद्दलच्या अपमान जनक व त्यामुळे बहुजन समाज अतिशय दुखी व व्यतीत झालेला आहे व तिन महापुरुष बहुजनांचे आराध्य दैवत्य आहे प्राध्यापक चंद्रकांत पाटील यांनी उपरोक्त वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे महापुरुषांच्या रचनात्मक तसेच समाज धोरण कार्याच्या नाहीतर बहुजन समाजालाही अपमान उपमर्द केलेला आहे त्यासाठी त्यांच्या आम्ही जाहीर निषेध क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळ चंद्रपूर व सर्व माळी समाजाच्या माध्यमातून आज दिनांक 10 12 2022 ला दुपारी बारा वाजता परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर च्या पुतळ्यासमोर त्यांच्या जाहीर निषेध केलेला आहे त्याप्रसंगी घोषणा दिल्या आणि लगेच चंद्रपूर सिटी चे पोलीस स्टेशन ठाणेदार यांना निवेदन देऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाईच्या करावी अशी मागणी केली.
त्याप्रसंगी माननीय गजाननराव गावंडे गुरुजी,नंदू नागरकर,राजू बनकर,घनश्याम वासेकर, रामदास दानव,राकेश चहारे,बबनराव वानखेडे,विजय राऊत,प्रशांत दानव,धनंजय दानव,वसंतराव चहारे,मनोज वासेकर,सचिन गावंडे,सचिन निंबाळकर,कुणाल चहारे, विनोद राऊत,भालचंद्र दानव, राकेश वानखेडे,राकेश चहारे.
Tags
Chandrapur