*गब्बर सिंग टॅक्सवाल्या सरकारला जनताच जमिनीवर आणेल : शिवानी वडेट्टीवार* / *Shivani wadettiwar*

गब्बर सिंग टॅक्सवाल्या सरकारला जनताच जमिनीवर आणेल : शिवानी वडेट्टीवार



चंद्रपूर :-
टॅक्स सुधारणा करण्याच्या नावावर गब्बर सिंग टॅक्स (GST - जीएसटी ) लावून जनतेला लुटण्याचे काम केंद्रातील भाजप सरकारने केले आहे. जीवनावश्यक वस्तू,शालेय वस्तू ,खादी एवढेच काय लहान मुलांच्या दुधावर देखील टॅक्स लावणारे हे एकमेव पंतप्रधान देशाने पहिल्यांदा पाहिले आहे.

असे पंतप्रधान पुन्हा होणे नाही,चांगल्या कामासाठी नव्हे तर जनतेला लुटणारे पंतप्रधान म्हणून यांची इतिहासात नोंद होईल.टॅक्स असूच नये या मताची मी नाही मात्र तो किती असावा हे मात्र ठरवले पाहिजे.देशातील लोकांचे उत्पन्न,पगार याचा ताळमेळ घालून नागरिकांना सन्मानाने जगता येईल अशी काहीतरी तडजोड त्यात असावी.दोन वेळच्या जेवणासाठी देखील लाचारीचे जीवन जगावे लागत असेल तर काय अर्थ आहे.

काँग्रेसच्या काळात देखील अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती.तेव्हा थोडी महागाई वाढली तरी टिवटिव करणारी मंडळी आता शांत बसली कारण त्यांना भीती आहे.मात्र काँग्रेस भक्कम विरोधी पक्ष म्हणून सर्वसामान्यांसाठी लढत आहे,लढत राहील.यामुळेच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत त्याचा प्रत्यय पाहायला मिळतो आहे.

दिवसेंदिवस गरिबांची संख्या वाढत आहे.तरीही पंतप्रधान त्याची दखल घेत नाही,या प्रकारचे दुर्दैव ते काय.लोकनियुक्त सरकार पाडणे आणि नव्याने निवडणूक होत असतील त्याठिकाणी भरमसाठ आश्वासने देत प्रचार करणे एवढेच काम सद्या सुरू आहे.

हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि जनतेला लुटणे देखील थांबले पाहिजे.
Previous Post Next Post