◼️शेतकरी पीक विम्यापासून वंचित अतिवृष्टीची नुकसान भरपाई तातडीने द्यावी..*
🔳 चंद्रपूर शहर जिल्हा कांग्रेस किसान सेलचे शहर अध्यक्ष भालचंद्र दानव यांची कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी..*
चंद्रपूर :- जिल्ह्यातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, अजुनही शेतक-यांना पीक विमा तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात आहे. अशावेळी शासनाने त्यांना मदतीचा हात देवून तातडीने पीक विम्याची रक्कम व नुकसान भरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटी किसान सेलचे शहर अध्यक्ष भालचंद्र भैय्याजी दानव यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
कृषीमंत्री धनंजय मुंडे हे दि. ३ जानेवारीला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता काँग्रेस किसान सेलचे शहर अध्यक्ष भालचंद्र दानव यांनी त्यांची भेट घेवून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधून परिस्थिती लक्षात आणून दिली. चंद्रपूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली. तसेच नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाला. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु अजुनही शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई शासनाकडून मिळालेली नाही. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम सुद्धा मिळालेली नाही. त्यामुळे शेतक- यांच्या या गंभीर समस्येकडे शासनाने लक्ष घालून पिकाची नुकसान भरपाई व विम्याची रक्कम तत्काळ मिळवून द्यावी, अशी मागणी किसान सेलचे शहर अध्यक्ष भालचंद्र दानव यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.
यावेळी ना. धनंजय मुंडे यांनी शेतक-यांच्या समस्यांकडे लक्ष घालून लवकरच त्यांच्या न्याय मागण्या पूर्ण करण्यात येईल, असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले. यावेळी निवेदन देताना काँग्रेस ओबीसी सेलचे चंद्रपूर शहर अध्यक्ष राहुल चौधरी, नौशाद शेख, कार्तिक वानखेडे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
चंद्रपूर