*मंडल यात्रेचे चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी तर्फे भव्य स्वागत*

◼️मंडल यात्रेचे चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी तर्फे भव्य स्वागत !


चंद्रपूर :- ओबीसीच्या अधिकारासाठी जनजागृती अभियानतंर्गत निघालेली मंडल यात्रा आज चंद्रपूर शहरात पोहचली.शहराच्या प्रमुख मार्गाने निघालेल्या मंडल यात्रेचे चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी कार्यालय समोर गिरनार चौकात चंद्रपूर शहर (जिल्हा )काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांचे नेतृत्वात ढोल तास्याच्या गजरात मंडल यात्रेचे प्रमुख ऍड अंजलीताई साळवे,प्रा.अनिल डहाके,ऍड विलास माथनकर,डाँ गावतुरे ,ऍड पुरूषोत्तम सातपुते तसेच इतर पदाधिकारी यांचे पुष्प माला घालून स्वागत केले.




यावेळी सेवादल चे अध्यक्ष सूर्यकांत खनके,महिला काँग्रेस अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे,माजी महापौर संगीताताई अमृतकर,ओबीसी विभाग उपाध्यक्ष उमाकांत धांडे,सरचिटणीस प्राचार्य नरेंद्र बोबडे,किसान सेलचे अध्यक्ष भालचंद्र दानव माजी नगरसेवक प्रसन्न शिरवार ,गोपाल अमृतकर वीणाताई खनके,वंदना भागवत,पप्पू सिद्धीकी,मनीष तिवारी,राजू वासेकर नौशाद शेख,सुल्तान अशरफ अली यांचे सह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post