*देशात हुकुमशाहीची अधिकृत सुरुवात खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची केंद्र सरकारवर टीका..*राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाचा निषेध..* *चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आंदोलन..*



◼️ देशात हुकुमशाहीची अधिकृत सुरुवात
खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची केंद्र सरकारवर टीका..*

◼️ राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाचा निषेध..*

◼️ चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आंदोलन..








चंद्रपूर : कॉंग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेने मोदी सरकार धास्तावले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव दिसत आहे. २०२४ च्या पराभवाच्या भीतीतून खासदारकी रद्द करण्याची कारवाई मोदी सरकारने केली आहे. देशात हुकमशाहीची ही अधिकृत सुरुवात आहे, अशी टीका खासदार बाळू धानोरकर यांनी केली.


चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (ता. २४) शहरातील गांधी चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार बाळू धानोरकर बोलत होते. यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष चंदाताई वैरागडे, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, दीपक जयस्वाल, जेसाभाई मोटवानी, अॅड. गोविंद भेंडारकर यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.


खासदार धानोरकर पुढे म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा सचिवालयाने घेतला आहे. मोदी या आडनावाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात दोषी ठरल्यानंतर राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, न्यायालयाने ३० दिवसांचा अवधी देऊनदेखील, आता राहुल गांधी यांच्यावर लोकसभा सचिवालयाकडून अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. अदानी प्रकरणावर मोदी सरकार अडचणीत आले आहे. त्यामुळे संसदे बाहेर राहुल गांधींना काढण्याचे पाप या सरकारने केले आहे.


काँग्रेसचे नेते खासदार राहुलजी गांधी यांनी देशात भारत जोडो यात्रा काढली. यात्रेदरम्यान समाजातील सर्व घटकांशी संवाद साधत दुख समजून घेतले. यात्रेला देशभरात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. राहुलजी गांधी यांनी संसदेमध्ये आणि संसदेबाहेर देशातील जनतेचा आवाज म्हणून कार्य केले आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारने जनतेचा आवाज दाबण्यासाठी राहुलजी गांधी यांचे खासदारपदच रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सुडबुद्धीने घेण्यात आला असून, केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष आता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी दिला आहे.


यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post Next Post