🔳 खासदार बाळू भाऊ धानोरकर यांनी लोकसभेत विचारला रेल्वेने बंद केलेल्या जेष्ठ नागरिक व अधिस्वीकृतीधारक पत्रकारांच्या सवलतीचा प्रश्न?
चंद्रपूर : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी बुधवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी अधिस्वीकृतीधारक पत्रकार व जेष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या रेल्वे भाड्यातील सवलतीवर प्रश्न उपस्थित केला.
COURTESY SANSAD TV
लोकसभेत खासदार बाळू धानोरकर यांनी विचारले की, कोविड महामारीपूर्वी रेल्वेत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना जी सवलत सुरू होती, ती सरकार पुन्हा सुरू करणार का? यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, रेल्वेला एक प्रवाशासाठी जर एक रुपया सोळा पैसे खर्च येत असेल तर रेल्वे फक्त ४५ ते ४८ पैसे भाडे आकारते. म्हणजेच जवळ जवळ प्रत्येक प्रवाशाला ५५ टक्के सबसिडी आधीच सुरु आहे. मागील वर्षी प्रवासी सेवेवर एकूण 59 हजार कोटींचे अनुदान देण्यात आले होते.
याशिवाय नवनवीन सुविधा, सोयी आणि अत्याधुनिक रेल्वे गाड्या प्रवाशांसाठी येत आहेत. खासदार धानोरकर यांनी केलेली सवलतीची मागणी सध्यस्थितीत शक्य नसून रेल्वेची स्थितीही पाहता मा. खासदार महोदयांनी समजून घ्यावे अशी विनंती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुरवणी प्रश्नाच्या उत्तरादाखल केली.
Tags
Chandrapur