*जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर खासदारांनी धारिवारल उद्योग बंदचे आंदोलन २१ डिसेंबर पर्यंत मागे* *MP Badu Bhau Dhanorkar postpone Dhariwaral Udyog Closed Agitation*

*जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर खासदारांनी धारिवारल उद्योग बंदचे आंदोलन २१ डिसेंबर पर्यंत मागे*

*नदीच्या प्रवाह बदलून धारिवाल कंपनीकडून पाण्याची चोरी*

*धारिवाल कंपनीच्या वॉटर स्टोरेजचा पाणीगळतीमुळे ३०० एकर शेती दलदलयुक्त*
*२८ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मागील सहा वर्षाचा मोबदला द्या*

*१६ किमी पाण्याची पाईपलाईन शेतातून गेल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला द्या*

*धारिवाल कंपनीची वेगळी पार्किग व्यवस्था निर्माण करा*

*खासदार बाळू धानोरकर यांनी कंपनीची पाहणी करून जिल्हाधिकारी यांना दिल्या सूचना*




*चौकशी समितीच्या निर्णयानंतर तात्काळ शेतकऱ्यांना मोबदला द्या : जिल्हाधिकारी*


चंद्रपूर : तालुक्यातील धारीवाल पॉवर प्लांट कंपनीच्या विविध प्रश्नासाठी मागील अनेक महिन्यापासून पाठपुरावा सुरु आहे. न्याय मिळत नसल्याने शेवटी टोकाची भूमिका घ्यावी लागली. आज जिल्हाधिकारी यांच्या विनंतीने हे आंदोलन तूर्तास थांबवून येत्या २१ डिसेंबर २०२२ पर्यंत या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले नाही तर कंपनीच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन करू, असा इशारा खासदार बाळू धानोरकर यांनी दिला.


वर्धा नदीवरील धानोरा - वढा येथे नदीच्या मध्यभागी इंटेक वेल निर्माण करून यांच्या माध्यमातून नदी पात्रातून शेतकऱ्यांच्या वाटयाला जाणारे पाणी कंपनी हिसकावून घेत आहे. तसेच या पाण्याचे ज्याठिकाणी संचय केल्या जात आहे, त्या त्याठिकाणी कंपनी तर्फे फ्लाय ऍशचा ही साठा केल्या जातो. धारिवाल कंपनीच्या वॉटर स्टोरेजचा पाणीगळतीमुळे ३०० एकर शेती दलदलयुक्त झाले आहे. या परिसरातील शेतात संचित जलसाठ्यातुन बारा महिने पाणी झिरपत असल्याने व धुळीने परिसरातील शेतकऱ्यांचे संपूर्ण शेतच उध्वस्त झाले आहे.



तसेच स्थानिकांना रोजगारांसाठी सध्यास्थितीत धारिवाल कंपनीत कार्यरत ९३५ व्यक्तींचे पोलीस व्हेरीफिकेशन व KYC तपासण्याच्या सूचना पोलीस स्टेशन पडोली व उपयुक्त श्रम यांना केल्या.

आज सकाळी साडे नऊ वाजता क्षेत्रातील खासदार बाळू धानोरकर यांने तहसीलदार निलेश गौड, तहसीलदार चंद्रपूर गौड, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी,धारीवाल कंपनीचे अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदनवार, पोलीस निरीक्षक घुघुस, पडोली, तालुका अध्यक्ष शामकांत थेरे, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, घुघुस शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांच्यासह वढा येथील पाणी पंपाची पाहणी केली व प्रदूषणग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीला भेट दिली येथून धारीवाल कंपनीत शेतकऱ्यां सह धडक देऊन कंपनी अधिकारी गांगुली व मुखर्जी यांची कानउघाडणी केली. शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई करीता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक लावण्यात आली होती.


यावेळी खासदार धानोरकर म्हणाले की, मागील तीन दिवसापासून सातत्याने धारिवालच्या या संपूर्ण कामाची चौकशी पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून होत आहे. धारिवाल कंपनी सर्रास लोकांची दिशाभूल करत आहे, सोनेगांव येथील धारिवाल कंपनीच्या पाण्याच्या बफर स्ट्रॉकमुळे २८ हुन अधिक शेतकऱ्याच्या जवळपास ३०० एकरच्या वर परिसरातील शेतीमध्ये दलदल झाली आहे. यामुळे जमीन शेतीयोग्य राहीली नाही. त्यासोबतच वढा येथे असलेल्या रेडीयल वेल मध्ये ५ पम्प व नदीपात्रात ४ पंम्प असे एकून ९ पंपांच्या साहाय्याने पाण्याची उचल करण्यात येते. त्याकरिता चक्क धारिवाल कंपनीने पाण्याच्या प्रवाहच बदलल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे. रेडीयल वेल ते कंपनी पर्यंत पाणी पोहचविण्याकरिता १६ किमी पाईपलाईन टाकण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, हि बाब अतिशय गंभीर आहे. यासर्व विषयाला घेऊन खासदार बाळू धानोरकर यांनी आज प्रत्यक्ष भेट दिली. आज कंपनी बंद करण्याची घोषणा खासदार बाळू धानोरकर यांनी दिली होती. परंतु जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या विनंती नंतर हे आंदोलन तुरतास मागे घेण्यात आले असून २१ डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी कंपनी व्यवस्थापकाला यावेळी दिले.
Previous Post Next Post