🔳 जनतेच्या पैशातून भाजपच्या इव्हेंट खपवून घेणार नाही..
◼️ खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले पालकमंत्र्यांपूर्वी ४०० मी. ट्रॅकचे भूमिपूजन..
चंद्रपूर : राज्यात भाजप - शिंदे सरकार आहे. परंतु चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार व चार काँग्रेसचे आमदार आहेत. जिल्ह्यात शासकीय कार्यक्रमाचे उदघाटन व भूमिपूजन हे होत असताना, यावेळी सतत लोकप्रतिनिधींच्या होत असलेला अपमान व शासकीय निधीतून भाजपचे इव्हेंट यामुळे लोकप्रतिनिधी व जनता त्रस्त झाले आहेत. आज देखील जिल्हा क्रीडां संकुल येथे ४०० मी. वॉकिंग ट्रकचे भूमिपूजन व इतर ट्रकचे लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शासकीय कार्यक्रम चक्क ४.३० च्या असताना ७ वाजता देखील पालकमंत्र्यांच्या पत्ता नसल्याने खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पालकमंत्र्यांपूर्वी ४०० मी. ट्रॅकचे भूमिपूजन करून या इव्हेंट त्यांनी विरोध केला.
आज चंद्रपूर येथे जिल्हा क्रीडा संकुलात वॉकिंग व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन करताना शासकीय पत्रिका काढण्यात आली. त्यासोबतच भाजपने स्वतंत्र पत्रिका काढत या कार्यक्रमाच्या इव्हेंट केला. यामध्ये चिमुकल्या मुलांना देखील या भाजप कार्यकर्त्यांनी सोडले नाही. त्यांनी पालकमंत्र्यांना खुश करण्यासाठी दुपारी तीन वाजेपासून या चिमुकल्याच्या हातात लेझीम व इतर साहित्य देऊन उभे केले. त्यासोबतच पोलीस व इतर विभाग देखील दुपार पासून सेवेत होता. परंतु नियोजन वेळेत भाजपचे कार्यकर्ते जमले नसल्यामुळे पालकमंत्र्यांच्य्या ७ वाजले तरी पत्ता दिसला नाही. जवळजवळ ३ तास उलटून देखील पालकमंत्र्यांच्या पत्ता नसल्याने परिणामी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्वतः भूमिपूजन केले. व यापुढे शासकीय कार्यक्रमात अशा प्रकारच्या लोकप्रतिनिधींच्या अपमान खपवून घेणार नसल्याचे खासदार बाळू धानोरकर यांनी सांगितले
Tags
Chandrapur