*शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा*
*खासदार बाळभाऊ धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या तर्फे शेतकऱ्यांच्या सन्मान*
वरोरा : शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष दिसून येत आहे. शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. परंतु सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीच निर्णय घेत नसल्यामुळे आज वणी येथून पायदळ हिवाळी अधिवेशन सुरु असलेल्या नागपूर कडे जात आहे. आज वरोरा येथील रत्नमाला चौक येथे सकाळी ८. ३० वाजता खासदार बाळभाऊ धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सन्मान केला.
यावेळी वरोरा शहर काँग्रेसचे अध्यक्ष विलास टिपले यांनी पदयात्रीचे पुष्पहार घालून स्वागत केले. याप्रसंगी कांग्रेस नेते माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, तालुका महासचिव मनोहर स्वामी, सरपंच नरेंद्र भोयर, अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष सलीम पटेल,युवक काँग्रेसचे राहुल देवडे, तिलकराज जमनोटीया,गोलु कश्यप व इतर पदाधीकारी उपस्थित होते.
या पदयात्रेला रत्नमाला चौकात संबोधित करताना किसान सभेचे जिल्हा सचिव अरुण वनकर म्हणाले की, 90 टक्के शेतकरी अल्पभूधारक आहे. तेव्हा वयाच्या साठ वर्षानंतर त्याला पाच हजार रुपये मासिक पेन्शन मिळावी, पूरग्रस्त अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी भरपाई मिळावी, वन कायदा 2006 नुसार वन जमीन अतिक्रमक्रमित वन हक्क दावे धारक झोपडपट्टी धारक आदींना जमिनीचे पट्टे मिळावे. शेतकरी आणि भूमिहीनांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. काॅ.अनिल घाटे (यवतमाळ), अनिल हेपट (वणी) रतन भोसले (वरोरा) यांच्यासह किसान सभेचे पदाधिकारी व शेकडो शेतकरी,शेतमजूर सहभागी झाले आहेत.
Tags
warora