*राज्यातील उद्योग परप्रांतात नेऊन शिंदे-फडणविस सरकारने युवकांना बेरोजगार केले.-फय्याज शेख.* *भद्रावतीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन.* *Fayyaz sheikh*

राज्यातील उद्योग परप्रांतात नेऊन शिंदे-फडणविस सरकारने युवकांना बेरोजगार केले.-फय्याज शेख.

भद्रावतीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन.


भद्रावती.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आपल्या तिन महिण्यांच्या कालावधीत राज्यात येऊ घातलेले मोठे उद्योग आपल्या नाकर्तेपणामुळे परप्रांतात जाऊ दिले यामुळे युवक प्रदेश अध्यक्ष महेबुब भाई शेख. व प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर यांच्या सूचनेनुसार आंदोलन करण्यात आले.राज्यातील व विदर्भातील युवक रोजगाराला मुकला असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष फय्याज शेख यांनी केला.स्थानीक बाळासाहेब ठाकरे प्रवेशव्दाराजवळ जिल्हाध्यक्ष फय्याज शेख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे दिनांक ३१रोज सोमवारला शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातात बॅनर घेऊन राज्यशासनाचा निषेध केला व शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.यावेळी जिल्हाध्यक्ष फय्याज शेख, शहर अध्यक्ष रोहण कुटेमाटे,प्रितम देवगडे,रोशन कोमरेड्डीवार,प्रमोद वावरे,राकेश किनेकर,अफजल शेख,कुणाल मेंढे,साफीन शेख,एजाज पठाण, आशिष मडकाम,शुभम बगडे,गोलु निखाडे,सिध्दार्थ नरवडे,साहिल देवगडे,नौशाद अली,अजय कावळे तसेच ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.
वेदांता फाक्सकान,टाटा एअरबस,व सैफ्रान ग्रुप हे प्रकल्प राज्यात होऊ घातले होते.यापैकी टाटा एअर बस प्रकल्प हा नागपुर येथील मिहानमध्ये सुरु होणार होता या प्रकल्पाअंतर्गत जवळपास सहा हजार युवकांना प्रत्यक्ष रोजगार ऊपलब्ध होणार होता मात्र हा प्रकल्प आता गुजरात येथील बडोदरा येथे गेला असल्यामुळे विदर्भातील युवकांचा रोजगार हिरावल्याचा आरोप यावेळी फय्याज शेख यांनी केला.
Previous Post Next Post