*राष्ट्रवादी चंद्रपूर शहर युवती राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन*

राष्ट्रवादी चंद्रपूर शहर युवती राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन



चंद्रपूर शहर जिल्हा युवती राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने चंद्रपूर शहर येथील चांदा क्लब ग्राउंड येथील परिसरात रांगोळी स्पर्धेचे आयोजन दिनांक 6/10/24 ला करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धेचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्या प्रमुख मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवती काँग्रेस चे शहर जिल्हा अध्यक्ष रितू पाटील व कार्याध्यक्ष सोनू आडेकर ह्यांनी केले.
रांगोळी स्पर्धा ही लाडकी बहीण योजना, मुलीनं साठी शिक्षण मोफत, आणि मोफत गॅस सिलेंडर योजना ह्या विषयावर रांगोळी स्पर्धे चे आयोजन केले होते. सदर स्पर्धे मध्ये प्रथम पारोतोषिक 3333 रुपये, द्वितीय 2222रुपये व तृतीय 1111रुपये असे बक्षीस ठेवण्यात आले होते रांगोळी स्पर्धे मध्ये 36 स्पर्धाकांनी सहभाग घेतला.



रांगोळी स्पर्धेचे निरीक्षक तथा प्रमुख पाहुणे म्हणून डॉ ममता अरोरा व सौ हर्षा राजीव कक्कड ह्यांच्या मार्गदर्शन मध्ये रांगोळी चे निरीक्षण करण्यात आले.
रांगोळी स्पर्धे मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर अध्यक्ष चारुशीला स. बारसागडे, महिला कार्याध्यक्ष हिमांगी बिस्वास, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष नौशाद सिदीकी, प्रमिला बावणे, अनिता रामटेके, जया रेवाल्लीवार, सारिका रामटेके आणि इतर पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
रांगोळी स्पर्धेचे निरीक्षकांनी निरीक्षण करून स्पर्धाकांना बक्षीस देण्यात आले ह्या मध्ये प्रथम पारोतोषिक लक्ष्मी चंद्रमणी पाटील द्वितीय सौंदर्या मेश्राम तर तिसरे बक्षीस 2 स्पर्धाकांना देण्यात आले ह्या मध्ये काजल सुरेश वाढगुरे व सुहानी संजय कुंडलकर ह्यांना देण्यात आले,
रांगोळी स्पर्धे मध्ये सहभागी सर्वं स्पर्धाकांना राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या वतीने सन्मानपत्र मान्यवारांच्या हस्ते देण्यात आले.
रांगोळी स्पर्धेचे छान नियोजन करून दिल्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड तसेच रांगोळी मध्ये सहभागी झालेले संपूर्ण स्पर्धक व स्पर्धेला लाभलेले प्रमुख अतिथी ह्यांचे युवती जिल्हा अध्यक्ष रितू पाटील व कार्याध्यक्ष सोनू आडेकर ह्यांनी आभार मानले.
Previous Post Next Post