*शहीद भगतसिंग चौक एस टी वर्क शॉप तुकूम येथील सौंदर्गीकरणा मुळे देशाचे महान राष्ट्र भक्त देशाचा अभिमान शहीद भगत सिंग यांच्या प्रतिमेचा अपमान होत असल्यामुळे घोड्याचे केलेले सौंदर्गीकरण तोडण्याची मागणी..* *चंद्रपूर जिल्हा इंटक काँग्रेसच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले निवेदन..*

🔳 शहीद भगतसिंग चौक एस टी वर्क शॉप तुकूम येथील सौंदर्गीकरणा मुळे देशाचे महान राष्ट्र भक्त देशाचा अभिमान शहीद भगत सिंग यांच्या प्रतिमेचा अपमान होत असल्यामुळे घोड्याचे केलेले सौंदर्गीकरण तोडण्याची मागणी..* 

🔘 चंद्रपूर जिल्हा इंटक काँग्रेसच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले निवेदन..*


चंद्रपूर :- शहीद भगतसिंग चौक एसटी वर्कशॉप  येथे मागील काही वर्षा पूर्वी मनपाद्वारे सौंदर्गीकरण करण्यात आले होते. पण मनपा अभियंता व प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी कुठलाही विचार न करता आपली बुद्धी वेशीवर टांगून देशाचे महान क्रांतिकारक नेते शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला मागे ठेवून त्यांच्या चेहऱ्या पुढे तीन घोडे उभारण्यात आले व त्या महान क्रांतिकारक नेत्याचा अपमान करण्यात आला. त्यामुळे आम्हाला घोड्यापेक्षा देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन देशाचे हिरो भगतसिंग महत्त्वाचे आहे. तरी आम्ही हा अपमान सहन करणार नाही लवकरात लवकर हे सुंदररीकरण तोडून त्या ठिकाणी शहीद भगतसिंग यांचा मोठा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा. याकरिता आज महानगरपालिकेचे आयुक्त साहेबांकडे निवेदनास्वरूपात मागणी करण्यात आली.

 
मनपाकडून कारवाई न झाल्यास ज्या पद्धतीने मनपा प्रशासनाने घोड्याचा मागील पृष्ठ भाग शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेकडे ठेवण्याचा नालायक प्रकार मनपा प्रशासनाने केलेला आहे. त्या संदर्भात ऊचित कार्यवाही न झाल्यास पृष्ठभाग दिखाव आंदोलन मनपा आयुक्तांपुढे करण्यात येईल याची नोंद मनपा प्रशासनाने घ्यावी. असे चंद्रपूर जिल्हा इंटक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती यांनी सांगितले...
Previous Post Next Post