◼️गोंडी संस्कृतीचे जतन करणे काळाची गरज..
◼️आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या उपस्थितीत विर-विरांगणा जयंती सोहळा पार पडला..
चंद्रपूर : गोंडी धर्मीय आदिवासी बहुउद्देशिय संघटना, भद्रावती तर्फे आज सोमवार दि. 25 डिसेंबर 2023 रोजी विर-विरांगणा जयंती सोहळा पार पडला. या सोहळ्याला गोंडी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. याप्रसंगी त्यांनी गोंडी समाजाचा इतिहास आणि परंपरेबद्दल मार्गदर्शन केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, गोंडी संस्कृती लोप पावत आहे. तिचे जतन करून पुढील पिढी पर्यंत पोहचविणे हि काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा ब्रिगेड सतीश पेंदाम, भद्रावती काँग्रेस शहर तालुका अध्यक्ष सुरज गावंडे, भद्रावती काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष प्रशांत काळे, निवृत्त पोलीस निरीक्षक बी. डी. मडावी, रमेश मेश्राम, प्रमोद नागोसे, संदीप कुमरे, छोटू धकाते, सचिन पचारे, महेश कोथडे, रितेश वाढई, शिव कोभे यांची उपस्थिती होती.
यावेळी गोंडी समाजाच्या इतिहास आणि परंपरेबद्दल माहिती देण्यात आली. तसेच, गोंडी समाजाच्या हक्कांसाठी लढा देण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाला शेवटी गोंडी नृत्य आणि संगीताचे कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमाने कार्यक्रमाला अधिकच रंगत आली.
Tags
चंद्रपूर