◼️रफी अहमद किदवाई विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा...*
चंद्रपूर दि. १५ ऑक्टोंबर २०२३:- येथील स्थानिक रफी अहमद किदवाई मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपुर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. भारताचे पूर्व राष्ट्रपती तसेच ‘मिसाइल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डाॅ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले. प्रकल्प प्रमुख शिक्षक मोहम्मद शाहनवाज आणि मज़हर खान होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मोहम्मद सादिक, पर्यवेक्षक मोहम्मद उस्मान, जेष्ठ शिक्षक मोहम्मद साबीर, मोहम्मद शकील, अब्दुल रतीब आणि इतर शिक्षक उपस्थित होते. शिक्षक मज़हर खान यांनी डाॅ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. महाविद्यालयाचे प्राचार्य मोहम्मद सादिक यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. रफी अहमद किदवाई मेमोरियल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अलहाज शफीक अहमद, कार्यकारी अध्यक्ष मकसूद अहमद, सचिव अॅड. मोहम्मद इकबाल यांनी वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Tags
Chandrapur