*परिवार वाचविण्यासाठी कौटुंबिक संवाद महत्वाचा :- ऍड. रफीक शेख यांचे प्रतिपादन..*

⭕️ परिवार वाचविण्यासाठी कौटुंबिक संवाद महत्वाचा :- ऍड. रफीक शेख यांचे प्रतिपादन...


चंद्रपूर :- अलीकडच्या काळात कौटुंबिक विसंवाद वाढत असल्याने कौटुंबिक समस्या निर्माण होत आहेत. एकमेकांशी मनमोकळ्या पणाने बोलून संवाद कायम ठेवला,कुरबुरी बाजूला ठेवून एकमेकांना समजून घेतले तर कौटुंबिक वाद दूर होतील व कुटुंब विभक्त होण्यापासूम वाचतील असे प्रतिपादन राष्ट्रीय मुस्लिम हक्क समितीचे प्रवक्ता ऍड. रफीक शेख यांनी केले.





जागृत मुस्लिम विकास बहुउदेशशिय संस्था चंद्रपूर आणि सामाजिक समता संघर्ष समिती यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित परिवार तुटण्यापासून कसे वाचावे या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.
बिनबा गेट परिसरातील बादशाह हॉटेल येथील सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षतेखाली मुस्लिम विकास मंच चे अध्यक्ष हाजी सय्यद हारून हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. नियाज कुरेशी,मौलवी मजिद, डॉ., नसरीन मवानी,सामाजिक समता संघर्ष समितीचे मोहम्मद इरफान शेख आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी ऑल इंडिया इत्तेहादे मुस्लेमीन,खवातिने इस्लाम चे अध्यक्ष शाहीन शेख,माँ फातिमा बहुउदेशशिय संस्था चे अध्यक्ष मुन्नी मुमताज शेख, हारमोनी कॉम्मुनिटी सर्व्हिस चंद्रपूर, सहारा बहुउदेशशिय संस्था चंद्रपूर चे अध्यक्ष शिरीन शेख, मिहान बहुउदेशशिय संस्था चंद्रपूर अध्यक्ष परवीन सय्यद, शिफा बहुउदेशशिय संस्था चे अध्यक्ष कौसर खान आदी याप्रसंगी उपस्थित होते.
 कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रुस्तम खान,आमीन खान ,अय्युब शेख, झाकीर शेख, शरीफ खान ,इमरान खान आदींनी अथक परिश्रम घेतले.




Previous Post Next Post