◼️ घरगुती सौर ऊर्जेच्या वापर वाढविण्यासाठी जनजागृती करा*
◼️ यापुढे घरगुती वीज मीटरचा तुटवडा पडणार नाही*
◼️ खासदार बाळू धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विद्युत समितीची बैठक*
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती केली जाते. त्याकरिता कोळशाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे प्रदूषणात देखील मोठ्या प्रमाणात भर घातली जाते. घरगुती सौर उजेच्या वापर वाढविण्यासाठी जनजागृती करून त्यात तीन किलो व्हॅट पर्यंत ४० टक्के तर चार ते दहा केव्ही पर्यंत २० टक्के अनुदान शासनातर्फे देण्यात येते. त्या अनुदानाचा लाभ नागरिकांना मिळवून देण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, सामाजिक कार्यकर्ते बाळू चिंचोलकर, अधीक्षक अभियंता मैत्रे, कार्यकारी अभियंता राठोड, बल्लारपूर येथील कार्यकारी अभियंता तेलंग, चंद्रपूर येथील कार्यकारी अभियंता पडोरे, वरोरा येथील कार्यकारी अभियंता घेडोर्ले, ब्रम्हपुरी अतिरिक्त कार्यकारी अभियंता खुलेंटकर, कार्यकारी अभियंता ,मेहुरे यांची उपस्थिती होती.
त्यासोबतच कृषी पंप जोडणी देखील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्या देखील तात्काळ जोडणीचे काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यासोबतच एक महिन्यात घरगुती वीजजोडणी व कृषी पंपाची वीज जोडणी तीन महिन्यांपर्यंत करणे बंधनकारक आहे. परंतु अनेकदा दिलेल्या कालावधीत जोडणी करण्यात येत नाही. त्यामुळे ग्राहकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. ते देखील योग्य कालावधीत करण्याच्या सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या.
Tags
Chandrapur