*सुधाकर अडबाले यांचा विजय हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय* *खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिल्या शुभेच्छा* *Sudhakar Adbale's victory is the victory of Mahavikas Aghadi's unity*

*सुधाकर अडबाले यांचा विजय हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय*

*खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिल्या शुभेच्छा*


चंद्रपूर : शिक्षक मतदार संघाचा आजवरच्या निवडणुकीच्या इतिहासात चंद्रपूरच्या उमेदवार कधीही निवडून आला नाही. मात्र, महाविकास आघाडी पुरस्कृत सुधाकर अडबाले यांनी या साखळीला छेद देत आपला विजय नोंदविला आहे. हि महाविकास आघाडीच्या एकजुटीची ताकत आहे. अशी प्रतिक्रिया खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिली. सुधाकर अडबाले यांच्या निर्विवाद विजयाबद्दल धानोरकर दाम्पत्यांनी त्यांचे अभिनंदन देखील केले.




शिक्षक मतदारसंघाची निवडणूक हि चुरशीची मानली जात होती. भाजपने दोन वेळा निवडून आलेले नागो गाणार याना आपला अधिकृत पाठिंबा दिला होता. मात्र महाविकास आघाडीने भाजपला धोबीपछाड देत. चंद्रपूरचे भूमिपुत्र सुधाकर अडबाले यांना निवडून आणले. यापूर्वी पदवीधर मतदार संघात भाजपचा बोलबाला होता. मात्र महाविकास आघाडीने अभिजित वंजारी यांच्या रूपात हा इतिहास बदलविला. त्यांची विजयी घोडदौड सुधाकर अडबाले यांच्या विजय हा याचीच प्रचिती आहे.

विशेष बाब म्हणजे मधल्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व होते. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपचे तत्कालीन गृहराज्यमंत्री अहिर यांना पराभूत करून खासदार बाळू धानोरकर यांनी इतिहास घडविला. विधानसभा निडवणुकीत देखील काँग्रेसचे आमदार निवडून आले. त्यासोबतच पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अभिजित वंजारी आणि आता शिक्षक मतदार संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले निवडून आले. त्यामुळे निश्चितच खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या झेंडा रोवणार यात शंका नाही.

आज झालेल्या निवडणुकीत शिक्षक मतदार संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांच्या विजयामुळे महाविकास आघाडीचे हात अधिक मजबूत झाले आहे. त्यांच्या विजयाबद्दल खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिल्या शुभेच्छा आहे.
Previous Post Next Post