*ठाकरे परिवाराच्या हातातून निसटले शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह;* *निवडणूक आयोगाने दिले हे निकाल!* *Shinde faction gets Shiv Sena name, bow and arrow election symbol*

◼️ ठाकरे परिवाराच्या हातातून निसटले शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह;

🔷निवडणूक आयोगाने दिले हे निकाल!




दिल्ली/मुंबई दि. १७ फेब्रुवारी :- केंद्रीय निवडणूक आयोगाने आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेपक्षाला मोठा धक्का दिला. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ (महाराष्ट्राचे मुख्यमंत्री) शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षाला दिले आहे.

काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगासमोर पक्ष आणि निवडणूक चिन्हावरील दाव्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली निवडणूक आयोगाने आपला निकाल देताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्षाने केलेली एक चूक अधोरेखित केली आहे.

या एका चुकीमुळे ठाकरे यांचा पक्षावरील दावा कमकुवत झाला असल्याचे म्हटले जात आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिलेया मुळे मागील सहा दशकांपासून ठाकरे आणि शिवसेना हे नातं आता संपुष्टात आल्याचे चित्र आहे.


*उद्धव यांना ही चूक भोवली!*

२०१८ मध्ये शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेला बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आलेला नव्हता ही मोठी चूक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेल्या १९९९ च्या पक्षाच्या घटनेत असलेले पक्षांतर्गत लोकशाही निकष बदलण्यात आले. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाच्या घटनेतील निवडणूक आयोगाकडून संमत करुन घेतले होते. पण २०१८ साली मध्ये झालेले बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात न आल्यामुळे शिवसेना पक्षाने २०१८ मध्ये पक्षाच्या घटनेत केलेले बदल लोकशाहीशी सुसंगत नाहीत, असे निरीक्षण निवडणूक आयोगानं नोंदवले आहे. पक्षांतर्गत निवडणूक निवडणुका न घेता पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने निवडणूक आयोगाचा विश्वास गमावला.

*शिंदे यांचा ठाकरेंना धक्का...*

बाळासाहेब ठाकरे यांनी १९९९यांनी पक्ष घटनेतील काही बदल हे लोकशाही मूल्याशी सुसंगत नव्हते. त्यावेळी निवडणूक आयोगाने हे बदल नाकारले होते. निवडणूक आयोगाच्या आक्षेपानंतर पक्ष घटना ही अधिक सुसंगत करण्यात आली. लोकशाही विरोधी असलेले बदल पुन्हा गुप्तपणे पक्ष घटनेत करण्यात आले. त्यामुळे पक्ष हा एका कुटुंबाची मालमत्ता झाली असल्याचे निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदवले. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता.

निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. आज निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे.

*पक्षाची संसदीय ताकद कोणासोबत*

एकनाथ शिंदे यांच्याकडे ६७ पैकी ४० आमदार आहेत. तर, लोकसभेतील १३ खासदार शिंदे गटासोबत आहेत. तर, उद्धव ठाकरे यांच्यासोबत लोकसभेतील ७ खासदार, राज्यसभेतील ३ खासदार आणि विधानसभेतील १३ आमदार सोबत आहेत. विधान परिषदेतील आमदारही ठाकरे यांच्या सोबत आहेत.
Previous Post Next Post