◼️ भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ काँग्रेसची मशाल यात्रा...
चंद्रपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा देशात सुरू आहे. सध्या या यात्रेचा प्रवास महाराष्ट्रातून सुरू आहे. या यात्रेच्या समर्थनार्थ चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (ता. ११) सायंकाळी ६ वाजता मशाल यात्रा काढण्यात आली. शहरातील गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून यात्रेला सुरुवात झाली. शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करत ही यात्रा कस्तुरबा मार्गाने गांधी चौक परिसरात पोहचली. त्यानंतर तेथे यात्रेचा समारोप झाला. यात्रेत खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे, ज्येष्ठ नेते विनोदभाऊ दत्तात्रय, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, शहर महिला जिल्हाध्यक्ष संगीता अमृतकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, प्रदेश सचिव विजय नळे यांच्यासह सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Tags
Chandrapur