◼️ प्रियदर्शनी चौक ते बस स्थानक या मार्गावरील मध्यरेल्वेच्या पूलाचे चौपदरीकरण करा...
◼️ खासदार बाळू धानोरकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे मंत्री अस्विन वैष्णव यांच्याकडे मागणी..
चंद्रपूर : शहरातुन मध्यरेल्वेची वर्धा - बल्लारशहा रेल्वे लाईन चंद्रपूर शहराला दोन भागात विभागून जाते. या रेल्वेलाइनवर प्रियदर्शनी चौक ते चंद्रपूर बस स्थानक या मार्गावर बस स्थानकाजवळ सन 1962-63 दरम्यान दुपदरी रेल्वे उड्डाण पूलाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. या पुलाची रस्ता धावपट्टी (Carriage Way) ही 7.00 मीटर रूंदीची आहे. तरी या पुलाचे खालून पोपडे निघाले असून ट्रक्चरल ऑडिट तात्काळ करून मध्यरेल्वेच्या रेल्वे लाईनवरील जुन्या रेल्वे पूलाचे चौपदरीकरण करण्याची लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे मंत्री अस्विन वैष्णव यांच्याकडे केली आहे.
चंद्रपुरात औद्योगीकरणामुळे तसेच ताडोबा व दूर्गापूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामुळे शहराचा विकास झाल्यामुळे परीसरातील रस्ता वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चंद्रपूर शहराच्या एका बाजूस विविधि शासकीय कार्यालय व दुसन्या बाजूस बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय दवाखाना असल्यामुळे बस स्थानकाजवळील या रेल्वे पूलावरील वाहतूक वर्दळ सुद्धा वाढलेली आहे. परीणामतः याः पूलावर वाहतुकीची कोंडी वारंवार होत असून हा दुपदरी पूल वाहतुकीस अपूरा पडत आहे. या पुलावरील वारंवार होणान्या वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता, सुरळीत वाहतुकीकरिता व वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकहितास्तव सदर जूल्या पूलाचे चौपदरीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. तरी चंद्रपूर शहरातील प्रियदर्शनी चौक ते चंद्रपूर बस स्थानक या मार्गावरील बस स्थानकाजवळील मध्य रेल्वेच्या रेल्वे लाइनवरील जुन्या रेल्वे पूलाचे चौपदरीकरण करण्याकरीता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे मंत्री अस्विन वैष्णव यांच्याकडे केली आहे.
Tags
Chandrapur