युवक काँग्रेसतर्फे महाकाली मंदिरात एक हजार दिव्यांची रोशणाई..
चंद्रपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची देशभरात भारत जोडो यात्रा सुरू असून, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. ही यात्रा यशस्वी होण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने चंद्रपूरकरांची आराध्य दैवत महाकाली मंदिर येथे एक हजार दिवे लावण्यात आले.
माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, युवक काँग्रेस प्रदेश महासचिव शिवानी वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा उपाध्यक्ष रमिज शेख, भानेश जंगम यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमात आतिफ रजा, राहुल बोल्लम, आयुष दानव, सलीम शेख, आनंद जंगम, कदिर शेख, राहिल शेख आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Tags
Chandrapur